Mahavastu Methodology

Mahavastu methodology &remedies – Marathi Blog

What is Mahavastu Methodology?

वास्तु हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ ‘वस निवासे’ म्हणजेच राहण्यायोग्य जागा. म्हणजे असे स्थान जे आपल्याला, आपल्या उन्नतिसाठि  पूरक ठरते.  वास्तु  हे शास्त्र  आहे, जे मानवाला आदर्श जीवन जगण्यास मदत करते. प्राचीन काळी  ऋषी मुनींनी वास्तू  शास्त्राच्या ज्ञानाचा अभ्यास केला मात्र तेव्हा तो फक्त राजा महाराजांपुरताच सीमित होता. राजाचे राज्य सुरळीत चालावे, प्रजेकडून त्याला मदत व्हावी, प्रजेचे सहकार्य मिळावे, अशा हेतूने, राज महालाची आणि प्रजेच्या घराची,  मांडणी केली असायची. मात्र कालांतराने आपण प्रजेसाठी हि वस्तू करू लागलो. महावास्तु  मध्ये आपण वास्तूच्या संतुलनाचे काम करतो, जसे पंचतत्त्व संतुलन आणि त्रिगुण (रजस, तमस आणि सत्व ). घराचे देखील या त्रिगुण आणि पंचतत्वात विभाजन करून, त्या त्या जागा व्यवस्थित करून  योग्य ते लाभ घेता येतात.

 

महावास्तु पद्धती

Mahavastu Methodology

पंचतत्वां (5 elements) बद्दल आपण खूपदा ऐकले असेल, वाचले असेल तर संपूर्ण ब्रह्माण्ड (Universe) हे  पंचतत्वांवर आधारित आहे. आपले शरीर (body) आणि आपली वास्तु (Vaastu) देखील. महावास्तुमध्ये आपण सर्वप्रथम घरात जे असंतुलन  झालेले आहे त्याची सांख्य दर्शनाच्या आधारे कारणे शोधतो. त्यानंतर बिना तोडफोड करता पंचतत्त्व आणि १६ दिशांच्या माध्यमातून ते संतुलित करतो. यामध्ये केवळ घरातील वस्तू इकडे तिकडे ठेवून, किंवा काही रंगांच्या पट्ट्या, धातूंच्या पट्ट्या, काही रंगांचे बल्ब, तैलचित्र, फोटोग्राफ्स, लावून, वैदिक वास्तुशाश्त्र प्रमाणे आधुनिक घरांमध्ये सुद्धा आपल्याला लगेचच उत्तम लाभ मिळतात. जातकाला काय समस्या आहे नेमके याचे मूळ जाणून घेतल्यास आपल्याला काम करणे सोपे जाते. मात्र या मुळापर्यंत जाण्यासाठी खूप सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. यासाठी अगदी ५ डिग्री चा फरक सुद्धा घरातील मोठे बदल घडवू शकतो. आणि अचूक निदान करण्यासाठी इतकाही फरक मान्य नाही. महावास्तु हे कोनीय विभाजन पद्धती (angular  division  method ) ने काम करते.  यामध्ये आपल्या घराचे प्रवेशद्वार सुद्धा योग्य दिशेत आहे कि नाही, हे जातकास येणाऱ्या अनुभवातून समजते. आणि अगदी सटीक निदानाद्वारे आपण १०० टक्के रिझल्ट देण्याचे काम करतो. आणि हा सर्व रिसर्च महावास्तु चे संस्थापक डॉक्टर खुशदीप बन्सल यांचा आहे.  गेल्या ३० वर्षात केलेले रिसर्च आणि १५००० हुन अधिक केस स्टडीज केलेल्या आहेत. ५००० हुन अधिक विद्यार्थी परिवार संपूर्ण जगभर उत्तम रित्या महावास्तु ची  प्रॅक्टिस करत आहे.

महावास्तु अनुभव – Vastu Experience

महावास्तु  चे टेकनिक  वापरून आपण धन, व्यापारवृद्धी , मनाची स्पष्टता, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, शिक्षण, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, नातेसंबंध अशा अनेक गोष्टींचे लाभ घेऊ शकतो. मात्र डॉक्टर्स प्रमाणे जिथे त्रास, तिथेच औषध; असे जर उपचार केले तर जातकास लगेच आराम मिळतो.

एक अनुभव सांगते, मला एका क्लायंट चा फोन आला होता. त्यांनी सांगितलं कि घरात कोणाचेच  एकमेकांशी पटत नाही. ना नवरा बायको चे नाते  ठीक आहे ना हि वडील मुलाचे. घरामध्ये खूपच विचित्र वातावरण निर्माण झेले आहे. वास्तू मुले काही घडत आहे का ? मी त्यांना सांगितलं, कि ३ महिन्या पुर्वी तुम्ही जी नैऋत्य दिशेला बाल्कनी मध्ये जे गार्डन केलेले आहे, तिथली सगळी झाडे पूर्वेच्या बाल्कनी मध्ये ठेवा. प्रथम तर त्यांना कळले नाही कि मी नैऋत्येची बाल्कनी आणि तिथली झाडे, हे कसे सांगितले? पण हि गुरूंची केबी सरांची देण आहे. महावास्तु आचार्य हे खूप इंटुईटीव्ह आहेत. त्यांनी ती झाडे हलवली आणि एका आठवड्यातच परत फोन आला आणि सांगितली, काही चमत्काराप्रमाणे आमच्या घरातलं वातावरण खूप खेळीमेळीचं झाले आहे. म्हणजे अगदी छोटीशी वस्तू इकडची तिकडे केल्याने खूप मोठा लाभ मिळतो. नैऋत्येला असणारे किचेन, टॉयलेट, किंवा झाडे अगदी हिरवा-चोकोलेटी रंगही आपल्या नातेसंबंधांमध्ये तणाव आणण्यास पूरक ठरतो. तर या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत.

आणखी एका क्लायंट चा अनुभव सांगते. त्यांचा ८ वर्षांचा मुलगा सतत आजारी पडायचा. बरेच डॉक्टर केले, वैद्य, हकीम, देवदेव. खूप काही केले. पण त्यांना कोणतेच औषध लागू होत नव्हते. त्यांना, माझ्या मैत्रिणीने माझ्या कडे पाठवले. त्यांच्याशी बोलताना जाणवले, कि मुलगा SSW च्या बेडरूम मध्ये झोपायचा. त्यांना फक्त त्याला आणि त्याच्या मेडिकल रिपोर्ट्स ना तिथून NNE च्या बेडरूम मध्ये शिफ्ट केलं, औषधोपचार सुरु ठेवले आणि अगदी २ महिन्यातच तो अगदी बरा झाला. आणि गुरु कृपेने आता त्याची तब्येत ठणठणीत असून, कोणताही आजार नाही. म्हणजे आपले आरोग्य सुद्धा आपण या महावास्तु च्या पद्धतीने मात्र डॉक्टर्स च्या सल्ल्यासोबत ठीक करण्यास मदतनीस होऊ शकते.

ईशान्य हि दिशा आपण वास्तू पुरुषाचे डोके मानतो. ईशान्य दिशेला अडगळ असणे किंवा खूप साऱ्या वस्तू ठेवणे  आणि त्यामुळे आपल्या डोक्यात नवनवीन कल्पना सुचत नाहीत. इतकाच काय तर बऱ्याचदा आयुष्य पुढे काय करावं याचीही कल्पना येत नाही. अगदी विचारशून्य होतो. अशावेळी तेथली स्टोर काढावं. बऱ्याच ठिकाणी मी खूप सारी पुस्तके एकावर एक ठेवल्याचे पहिले आहे. ते हि एक प्रकारचे स्टोर बनते. आपण स्वतः ला खूप शहाणे, विद्वानात समजू लागतो. इथे हे स्टोर काढल्यास, मनुष्याचे विचार प्रगल्भ होण्यास मदत होऊन आपण जीवनात प्रगती करू शकतो.

महावास्तु १६ झोन्स Mahavastu 16 Zones

महावास्तु मध्ये १६ दिशा म्हणजेच १६ झोन्स मध्ये काम करतो. यामध्ये ईशान्य हि जलतत्वाची सिद्ध हीच  विचारांना स्पष्टता देणारी, जीवनात प्रेरणा देणारी  दिशा तर ENE हि जीवनात निखळ आनंद देणारी, मैत्रीभाव जपणारी वायू तत्वाची  दिशा आहे. पूर्व दिशा – सूर्य देवतेची, आपल्याला जगासोबत जोडणारी  ESE  हि मंथन घडविणे आणणारी, विश्लेषण करावणारी दिशा आहे. ENE(पूर्व-उत्तर-पूर्व) , पूर्व आणि ESE (पूर्व-दक्षिण-पूर्व)  या वायुतत्वाच्या दिशा आहेत. आग्न्येय जी अग्नितत्वाची दिशा आहे ती पैसे देते. तर SSE(दक्षिण-दक्षिण-पूर्व) हि शक्ती आणि आत्मविश्वास देणारी दिशा आहे. दक्षिण दिशा आपण नकारात्मक मानतो मात्र हीच दिशा आपणास यश, प्रसिद्धी मिळवून देते आणि चांगली शांत झोपही देते. आग्न्येय, SSE आणि दक्षिण या तीनही दिशा अग्नी तत्वाच्या आहेत. SSW(दक्षिण-दक्षिण-पश्चिम) हि दिशा उत्सर्जन करणारी, विसर्जन करणारी तर त्यापुढची  आपली पितरांची दिशा नैऋत्य. नैऋत्य दिशा आपल्या नातेसंबंधा ना जोडून ठेवणारी दिशा आणि आपल्या कौशल्यात परिपूर्णता देणारी दिशा. या दोनही पृथ्वी तत्वाच्या दिशा. यानंतर WSW(पश्चिम-दक्षिण-पश्चिम) दिशा जी आपल्याला आपल्या शिक्षणात मदत करते आणि ज्ञानार्जनाच्या सहयोगी ठरते. त्यानंतर पश्चिम दिशा जी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते, आपल्याला लाभ मिळवून देते. WNW (पश्चिम-उत्तर-पश्चिम) हि दिशा म्हणजे आपले कोप भवन, इथे आपण मनाची उदासीनता देणारी दिशा म्हणू शकतो. WSW, west  आणि WNW  या तीनही आकाश तत्वाच्या दिशा आहेत. पुढे वायव्य दिशा जी आपणास नेहमी सहयोग, सपोर्ट मिळवण्यास मदत करते. इथे पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व दोन्हीही आहे. त्यानंतर जलतत्वाच्या NNW , north  आणि NNE  या दिशा. NNW  (उत्तर-उत्तर -पूर्व) हि आपली कामुकतेची दिशा, तर उत्तर हि आपल्याला ग्राहक  मिळवून देणारी, नवीन अवसर प्रदान करणारी दिशा. NNE  हि आरोग्यवर्धिनी, आरोग्यदायिनी असणारी दिशा. तर अशा प्रकारे केबी टेकनिक द्वारे आपण आपल्या घरात १६ झोन्स च्या माध्यमातून संतुलन साधू शकतो. या दिशांमध्ये असंतुलन झाल्यास आपल्या जीवनातही असंतुलन निर्माण होते.

 

महावास्तु  उपचार Maha vastu Remedies

महावास्तु  उपचारांमध्ये, अगदी गॅस खाली एकाद्या रंगाचा टाइल ठेऊन , किंवा एखाद्या दिशेला विशिष्ट रंगाचा बल्ब लावून आपण उपचार करतो. प्रथम घरातील असंतुलन दूर करून, नंतर रंगांचा वापर करून त्याला संतुलित करतो. आणि मगच रेमेडी म्हणजे उपचार लावतो. नैऋत्येला बसलेला नंदी ठेवल्यास, अकस्मात येणारी संकटे रोखली जाण्यास मदत होते आणि व्यवसायात  स्थिरता येते. इंद्र देवाची मूर्ती जर पूर्वेस ठेवली तर सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतात आणि ऐश्वर्य दायी ठरतो. देवांचा खजिनदार असलेल्या यक्षराज कुबेराच्या मूर्तीची स्थापना जर उत्तर दिशेला केली तर नवीन अवसर आणि पैसे चालून येतो. ईशान्येस जर पितळी  त्रिशूल ठेवले तर आपल्या त्रिगुणांची स्पष्टता आपणास येते

हिरवळीचे चित्र जर उत्तर भिंतीवर लावले, तर व्यापारात नवीन ग्राहक येण्यास मदत होते आणि जर खेडेगावची चित्र पश्चिमेस लावले तर जागेसंबंधीची कामे मार्गी लागतात, स्वतः चे घर होण्यास मदत होते.  जर ब्रह्मस्थानाकडे तोंड करून उभा असलेला लाल रंगाचा हत्ती जर दक्षिणेस लावला तर तो यशदायी ठरतो. पैशाचा अपव्यय होत असेल, पैसे खूप खर्चिला जात असेल तर SSW मध्ये पिवळ्या रंगाची फुलदाणी ठेवावी. याने अनावश्यक खर्च कमी होतात आणि बचत वाढते.

जर आपली सरकारी कामे पूर्णत्वास जात नसतील, कोर्टकामात दिरंगाई, आरोप आणि  सरकार दरबारी कामात अडथळे येत असतील, तसेच नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळत नसेल तर आपल्यादेशाचा राजदंड – अशोक स्तंभ – त्याचे प्रतीक वायव्य दिशेला टेबलवर ठेवावे. हे आश्चर्यचकित करणार फळ देते.

कामधेनू  गाय  जी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते, ती जर ESE  मदत=ये जमिनीवर ठेवली तर मनातील द्वंद्वव, दुःख दूर सारून मनातील सर्व इच्छा पूर्ण करते. ब्रह्माण्डाचा पालनकर्ता विष्णू, त्यांचे वाहन गरुड, ज्याची नजर तीक्ष्ण आहे, जो दूरदृष्टी दाणी मानवीय बुद्धीचा मेळ आहे त्याची पितळेची प्रतिमा जर नैऋत्येला ठेवली तर आपण कोणतेही काम दक्षतेने करू लागतो.

असे अनेक छोटे छोटे उपचार आहेत, ज्यांचा वापर करून आपण आपल्याला हवे ते, योग्य लाभ घेऊ शकतो. मात्र हे उपचार करणे पूर्वी आपल्या घरातील संतुलन खूपच महत्वाचे आहे.

योगदान Yogdaan

योगानेच बनते योग्य कर्म. येथे योग  म्हणजे अभिचार. आणि योगदानाने आपण जर कोणाच्या आयुष्यात चांगल्या काही गोष्टी घडवून अनु शकत असू तर, त्या इतके पुण्य कर्म नाही. याच विचाराने केबी सरांच्या प्रेरणेने  मी देखील दर शनिवारी दुपारी ३ ते ७ या वेळेत योगदान करते. यामध्ये कोणत्याही समस्येवर वास्तू नुसार  १५ मिनिटांचे मोफत मार्गदर्शन करते. जर आपणापैकी कोणाला याचा लाभ घ्यावयाचा असेल तर मला माझ्या मोबाइलला क्रमांकावर whatsapp मेसेज करावा.

शुभं भवतु

आचार्य राही होमकर- गौड

Acharya Rahee Gaur

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top